व्हॉटस् अॅपवर टाकला स्वतःचा नग्न फोटो
महिला बालविकास प्रकल्प अधिकार्याने स्वतःचा नग्न फोटो महिला अंगणवाडी कर्मचार्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर पोस्ट केला. या प्रकाराने खळबळ उडाली असून अधिकार्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अधिकार्याने असभ्य वर्तन केल्याच्या तक्रारी आहेत. याप्रकरणाच्या चौकशीसाठी बालविकास विभागाच्या उपायुक्त गुरुवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बीड येथील महिला बालविकास प्रकल्प अधिकार्याने बुधवारी चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा आंघोळ करतानाचा नग्न फोटो पोस्ट केला. या प्रकारामुळे गोंधळ उडाला असून महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यापूर्वीही या अधिकार्याने त्याचे प्रायव्हेट फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती.